हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने चालवण्याच्या नादात वाहनांचे अपघात होण्याच्या घटना घडतात. असाच विचित्र अपघात हा शनिवारी कराड तालुक्यातीलगोटे गावच्या हद्दीत झाला. या ठिकाणी महामार्गावरून जात असलेल्या पाच आलिशान वाहने अचानक एकामागून एकास जोरदार धडकली. यामध्ये वाहनांचे पुढील भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-चिपळूण महामार्गाचे रुंदीकरणाचे काम झाल्यामुळे या मार्गावरून सुसाटवेगाने वाहने जातात. चिपळूणला जाण्यासाठी पर्यटक व प्रवाशी या महामार्गाचा वापर करतात. या महामार्गावरून भरधाव वेगाने चालवण्याच्या नादात वाहनाचे अपघातही होतात. अशीच विचित्र अपघाताची घटना शनिवारी सायंकाळी घडली. कराड – चिपळूण मार्गावरून निघालेल्या पर्यटकांच्या पाच आलिशान गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक दिली.
पाच वाहनांची एकमेकांना पाठीमागून झालेली भीषण धडक इतकी जोरात होती कि या धडकेचा आवाज महामार्गाच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना ऐकू गेला. वाहनांच्या धडकेनंतर पाठीमागून आलेल्या वाहनचालकांनी त्यांची वाहने महामार्गाच्या कडेला उभी केली तसेच या विचित्र अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
भरधाव वेगाने जाणाऱ्या 5 आलिशान वाहनांची एकामागून एकास धडक; नेमकं घडलं काय? pic.twitter.com/jEzwZujSDT
— santosh gurav (@santosh29590931) June 10, 2023
महामार्गावर अपघातस्थळी पोलिसांनी भेट देत वाहनांच्या भोवती जमलेली बघ्यांची गर्दी इतरत्र केली. तसेच महामार्गावर अपघातामुळे उध्दभवलेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या विचित्र अपघाताचे कारण म्हणजे समोरच्या वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून आलेली वाहने एकमेकांवर आढळल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती.