येणकेत बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड तालुक्यातील येणके येथे पाच वर्षीय आकाश बिगाशा पावरा या ऊसतोड मजुरांच्या मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून ठार केले. सकाळी 7 वाजता ही घटना येणके- किरपे रस्त्यावरील शिवारात ही घटना घडली आहे.

येणके गावच्या हद्दीतील इनाम शिवारात ऊसतोड सुरू होती. सकाळी सात वाजता पाच वर्षीय मुलगा रानात खेळत होता. पाठीमागून बिबट्याने मुलांवर हल्ला केला, त्यानंतर ऊसाच्या शिवारात जवळपास अर्धाकिलोमीटर अंतरावर मुलाला बिबट्याने उचलून नेले आहे. या प्रकारामुळे ऊसतोड मजुरांनी बिबट्याचा पाठलाग केला. मात्र मुलाला वाचविण्यात यश आले नाही.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/663982644988873/

कराड तालुक्यातील किरपे, येणकेसह तांबवे – सुपने भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून गेल्या काही दिवसापूर्वी दक्षिण तांबवे येथेही बिबट्याने एका मुलावर हल्ला केला होता. तर गेल्या आठवड्यात चचेगाव येथील महिलेवरही बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने दखल घेवून बिबट्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व ब्रेकिंक बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा.

Click Here to JOIN our WhatsApp Group