परळीतील माफियाराज विरोधात लढाई सुरु; पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. परळीतही निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सध्या सुरळीत माफियाराज सुरु आहे. या माफियाराजा विरोधात आपण लढा देत आहोत. कार्यकर्त्यांनो तुमचा नेता थकलेला नाही. कामाला लागा. लढाई आता सुरू झाली आहे, अशी टीका मुंडे यांनी केली.

सुरळीत आयोजित एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. यावेळी त्या म्हणाल्या की, “आगामी काळात परळीत नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करणे गरजेची आहे. आगामी काळातील निवडणूक लक्षात घेता आरोप-प्रत्यारोपांची लड अजून वाढतच जाईल, यात शंका नाही. मात्र, आता गप्प बसणार नाही. या ठिकाणी सध्या माफियाराज सुरू आहे. त्याच्या विरोधात लढा देणार आहे.

अजून निवडणुकीला खूप दिवस शिल्लक आहेत. मात्र, मला गप्प बसता येणार नाही. धनंजय मुंडेंवर टीका करण्यासाठी मला त्या पातळीला जावे लागेल. मात्र, ते मला कधीच जमणार नाही. तसे मी करणारही नाही. कार्यकर्त्यांनो निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा. लढाई आता सुरू झाली आहे, असे मुंडे यांनी म्हंटले.

You might also like