हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता सामान्यांना सुद्धा विमानाने प्रवास करणे शक्य झाले आहे. परंतु विमान प्रवास करताना कोणत्या बाबतीत चेष्ट गम्मत करावी याचे अनेकांना भान नसत. आणि याचा परिणाम संपूर्ण यंत्रणेला सोसावा लागतो. अशीच एक धक्कादायक आणि अजब घटना पुण्यातून उड्डाण केलेल्या विमानात घडली आहे.
अकासा एअरलाईनचे विमान पुण्याहून दिल्लीसाठी शुक्रवारी रवाना झाले. सुरक्षेच्या बाबतीत सर्व काही बाबींची पूर्तता विमानतळावर करण्यात आली होती. मात्र विमान प्रवास सुरु झाल्यानंतर काहीच वेळामध्ये विमानातील एका प्रवास्याने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे ओरडून सांगितले. त्यामुळे विमानातील सर्वच प्रवाश्यांची घाबरगुंडी उडाली. या घटनेबद्दल सर्व माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्टांच्या सांगण्यावरून या विमानाचे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग मुंबई विमानतळावर करण्यात आले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी विमानाचा ताबा घेतला आणि सर्व प्रवाश्यांना सुखरूप काही उतरवण्यात आले.
बॉम्ब असल्याची माहिती सांगणाऱ्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची बॅग तपासली असता बॅगेत कुठलीही आक्षेप घेता येईल अशी वस्तू सापडली नाही. त्यानंतर संपूर्ण विमानाची देखील तपासणी करण्यात आली मात्र त्यामध्ये काहीच सापडू शकले नाही. याबद्दल संबंधित प्रवाश्याला विचारना केली असता. माझ्या छातीत दुःखत होते म्हणून मला तात्काळ उपचार मिळावे या उद्देशाने अशी अफवा मी पसरवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. यानंतर सदर प्रवाश्याला योग्य तो उपचार देऊन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.