व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुंबई- गोवा महामार्गाचे काम अजूनही का पूर्ण नाही? गडकरींनी सांगितलं नेमकं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) कामाची सुरुवात 2011 ला झाली. मात्र तेव्हापासून ते आजतागायत ह्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण होताना दिसत नाही. मुंबईपासून सुरु होणारा हा महामार्ग गोवा पर्यंत एकूण  471 km लांबीचा आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासासाठी ह्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे महत्व अनन्यतुल्य आहे तरी  देखील ह्या महामार्गाचे काम आजपर्यंत पुर्ण झालेले नाही. याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीदरम्यान विचारना केली असता ” यासाठी सर्वस्वी मीच  जबाबदारी असल्याचे मी समजतो असे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ वृत्तसमुहाच्या कॉफी टेबल कार्यक्रमातील ‘मनातले गडकरी’ या सदरखाली झालेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेते प्रशांत दामले गडकरींना प्रश्न केला की, “तुमच्याबाबतीत म्हटलं जातं की, एखादं काम होणार असेल होणार आणि होणार नसेल तर होणार नाही. तुम्ही एकदा ठरवले की हे करायचे तर करणार नाहीतर नाही होणार मग २०१४ पासून २०२३पर्यंत मुंबई गोवा महामार्ग का झाला नाही? यावर गडकरी म्हणाले की, ” हा महामार्ग झाला नाही तर त्याला मीच जबाबदार आहे. याची जबाबदारी मी दुसऱ्यावर ढकलंत नाही. कोकणातील नदीवरील पूल वाहून गेला, त्यानंतर तो आम्ही ८-९ महिन्यात पूर्ण केला. खरं म्हणजे हा महामार्ग जर आधीच पूर्ण झाला असता तर हे लोकही मृत्यू पावले नसते. असं गडकरी यांनी म्हंटल.

मुंबई गोवा हा महामार्ग महाराष्ट्र सरकारकडे दिला होता. त्यावेळी छगन भुजबळ मंत्री होते. भुजबळांनी टेंडर काढून याची कामे दिली. यानंतर त्यातील कॉन्ट्रॅक्टर बदलले, काही अडचणी आल्या. जमीन अधिग्रहण करताना तर अजूनही अडचणी येत आहेत. पण ज्या काही अडचणी असतील त्यासाठी मी कोणालाही जबाबदार धरत नाही असं गडकरींनी म्हंटल. मुंबई  – गोवा महामार्ग पुर्ण व्हावा यासाठी मी आत्तापर्यंत सर्वाधिक बैठका घेतल्या असल्याचे देखील नितीन गडकरी यांनी सांगितले. मुंबई – गोवा महामार्गाच्या बाबतीतील अडचणी  दूर करण्यासाठी तब्बल 75- 80 बैठका घेतल्या आहेत, तरीदेखील यातून तोडगा निघणे  कठीण होऊन बसले आहे. मात्र येत्या डिसेंबर पर्यंत हा प्रकल्प पुर्ण करू असे आश्वासन नितीन गडकरी यांनी मुलाखती दरम्यान दिले आहे.