हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ऑनलाईन वस्तू खरेदीचे (Online Shopping) प्रमाण मोठया प्रमाणात वाढलं आहे. बाजारात जाऊन स्वतःचा वेळ खर्च करून आणि महत्वाचे म्हणजे दगदग करून वस्तूंची खरेदी करण्याला अनेकजण कंटाळा करतात. अशावेळी मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन वस्तू विकत घेण्याकडे अनेकांचा कल पाहायला मिळत आहे. ऑनलाईन वस्तूंच्या खरेदीसाठी इ कॉमर्स प्लॅटफॉर्मचा विचार केलयास भारतात Amazon, Flipkart, meesho, myntra यांसारखे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. या सर्वात आता Flipkart ने आपल्या ग्राहकांसाठी खास सर्व्हिस आणली आहे. त्या अंतर्गत Flipkart फक्त १० मिनिटांत वस्तू करणार आहे.
Flipkart आता क्विक कॉमर्सचा भाग बनणार आहे. यामध्ये ग्राहकांपर्यंत अतिशय वेगाने वस्तू पोहोचवल्या जातील. यामुळे ग्राहकांना अगदी कमी वेळेत वस्तू खरेदी करता येतील आणि फ्लिपकार्टवर सुद्धा ग्राहकांची संख्या वाढण्यास मदत होईल. एका अहवालानुसार, फ्लिपकार्टची मूळ कंपनी वॉलमार्ट येत्या एक-दोन महिन्यांत 10-15 मिनिटांत डिलिव्हरी सेवा सुरू करणार आहे. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांच्या सोयीची खूप काळजी घेते. ग्राहकांना सोप्प्या पद्धतीने वस्तू खरेदी कशा करता येतील याकडे फ्लिपकार्टचा कटाक्ष असतो. बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनी यूजर्ससाठी सतत नवनवीन सेवा आणत आहे. अलीकडेच Flipkart ने आपल्या प्लॅटफॉर्मवर UPI सेवा सुरू केली. आता कंपनी ग्राहकांसाठी फास्ट डिलिव्हरी सुरू करणार आहे.
कोणकोणत्या शहरात मिळणार फास्ट डिलिव्हरी –
सुरुवातीच्या टप्प्यात फ्लिपकार्ट भारतातील प्रसिद्ध शहरांमध्ये आपली फास्ट सर्व्हिस सुरु करणार आहे. यामध्ये मुंबई, इंदूर, बेंगळुरू, हैदराबाद, कोईम्बतूर, नागपूर, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, रायपूर, भुवनेश्वर, लखनौ, जयपूर, गुवाहाटी, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, लुधियाना, विजयवाडा आणि पाटणा येथे सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे या शहरातील ग्राहकांना अगदी कमी वेळेत वस्तुंची खरेदी करता येणार आहे.