फ्लिपकार्ट येत्या सहा महिन्यांत 40 हून जास्त शहरांमध्ये देणार ई- किराणाची सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीने म्हटले आहे की, येत्या सहा महिन्यांमध्ये कंपनी ई- किराणा सेवामध्ये वाढ करणार आहे. येत्या सहा महिन्याच्या काळात ते 40 हून अधिक शहरांमध्ये किराणा विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणार आहेत. वॉलमार्टच्या मालकीची ही कंपनी देशात वाढणाऱ्या ई- किराणा क्षेत्रावर यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकणार आहे. फ्लिपकार्ट आपली ई किराणा सेवा कोलकता, अहमदाबाद आणि वेल्लोर सह 50 हून अधिक शहरांमध्ये सद्ध्या देत आहे.

मंगळवारी (2 मार्च 2021) फ्लिपकार्टने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ई किराणा सेवेच्या विस्तारामुळे सात मोठे शहरे आणि जवळपास 40 हून अधिक शेजारच्या लहान शहरांना उच्च प्रतीचे किराणा उत्पादने, उत्पादन ऑफर, जलद वितरण आणि अखंडित किरणा खरेदीचा अनुभव मिळणार आहे. करोणा महामारीमुळे लाखो लोक ऑनलाईन किराणा खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे, ई किराणाला केवळ महानगरांमध्ये नाही तर, या मोठ्या शहरांच्या आसपासच्या छोट्या शहरांमध्येही मोठी मागणी आहे.

सन 2021 पर्यंत 24 अब्ज जीएमवी म्हणजेच क्रॉस मर्चंट व्हॅल्यू पर्यंत वाढण्याचा अंदाज रेडसिजर या कंपनीने व्यक्त केला आहे. बिग बास्केट आणि इतर ई-कॉमर्स कंपन्या ह्या फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि रिलायन्स सारख्या दिग्गज मोठ्या कंपन्यांसोबत देशातील ई किराणा विभागात स्पर्धा करतात. यामुळे ग्राहकांना चांगल्या प्रतीचा किराणा, तोही ऑफर सहित मिळायला मदत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.