कचरा वेचणाऱ्या महिलांच्या घराचे वीजबिल आले १५ हजार रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय गेले. हातावरचे पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न असताना महावितरणने भरमसाठी वाढीचे वीजबिल ग्राहकांना देऊन शॉक दिला. संजयनगर येथी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना देखील असाच शॉक महावितरणने दिला आहे. याठिकाणी राहणाऱ्या कचरा वेचक महिलांच्या घरचे लाईट बिल हे १५ हजार रुपये आले आहे.

हाताला काम नसल्याने ते भरायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कचरावेचक महिलांचे वीजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी अवनी संस्थेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोव्हिड काळात कचरावेचकांचा व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यांची परिस्थिती खूप हालाकिची झाली आहे. त्यातच वाढीव विजबिलामुळे त्याचे कंबरडे मोडले आहे. कचरावेचक महिलांच्या घरांचे तीन महिन्यांचे वीज बिल हे १५ हजार रुपये इतके आले आहे.

महावितरणकडून विजबिल भरण्याचा तगादा लावला जात आहे. उपासमार होत असलेल्या कचरावेचकांनी हे बिल कसे भरावे हा गंभीर प्रश्न तयार झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील विजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी अवनी संस्थेच्यावतीने जिल्हाधिकऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अनुराधा भोसले, जिल्हासमन्वयक जैन्नुद्दिन पन्हाळकर, सामाजिक कार्यकर्ता सोनाली कांबळे, कचरावेचक संघटनेच्या स्मिता गायकवाड, रूपाली गोसावि, द्रूपदा कांबळे इत्यादी उपस्थित होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment