आसामला आलाय पूर ; जॉन अब्राहम करतोय मदतीची विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना, आसाम राज्य पुर आणि करोना अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत ८५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आसाममध्ये आलेल्या या संकटावर बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने प्रतिक्रिया दिली आहे.

जॉनने आसाममधील परिस्थितीचे फोटो ट्विट करुन त्यांना त्वरित मदत करावी अशी विनंती देशवासीयांना केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पूरपरिस्थितीचा राज्यातील २८ जिल्ह्यातील 32 लाख नागरिकांना या परिस्थितीचा फटका बसला आहे. दरम्यान एनडीआरएफतर्फे बचावकार्य सुरु आहे.

भारतीय हवामान विभागाने २१ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे अद्याप आसामसमोरचं संकट टळलेलं नाहीये. गुवाहटी, दिब्रुगढ, धुबरी, गोलपारा, जोरहाट, लखीमपूर, बिस्वनाथ, उडलगुरी, बक्सा, नलबारी, बारपेटा, कामरुप,मोरीगाव, नागाव अशा महत्वाच्या जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे.

Leave a Comment