दिल्ली प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान करणारी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तापेच सोडविण्यासाठी उद्याच बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. यामुळे फडणवीस सरकार यांची उद्या अग्निपरीक्षाच असेल असे म्हणावे लागेल.
या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेत उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी गुप्त मतदान नकोच असे बजावले आहे. उद्याच हंगामी अध्यक्ष यांच्या मार्फत ही प्रक्रिया पार पडावी असे न्यायालयाने म्हंटले आहे. कुठल्याही स्वरूपाचे घोडेबाजार चालू नये यासाठी लाइव टेलीकास्ट करण्याचे सुद्धा आदेशात स्पष्ट केले आहे.
सुप्रीम कोर्टचे आदेश-
उद्याच बहुमत चाचणी घ्या
आधी सदस्यांचा शपथविधी आणि नंतरच मतदान. वेळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत
गुप्त मतदान नको, या घडामोडीचे लाईव्ह टेलिकास्ट करा.
Floor test in Maharashtra Assembly on Nov 27 before 5 pm, orders Supreme Court
Read @ANI Story | https://t.co/tqDycKMScK pic.twitter.com/gNInjdjMfk
— ANI Digital (@ani_digital) November 26, 2019