Fly-In Community : एक असे गाव जिथे प्रत्येकाकडे आहे स्वतःचं विमान; जाणून घ्या ‘या’ गावाबाबतची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fly-In Community : मित्रांनो, लहानपणी आकाशातील विमानात बसण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आजही कित्येकदा जेव्हा आपण आकाशातून एखादे विमान उडताना पाहतो तेव्हा आपसूकच आपली नजर त्याकडे वळते. विमान आहेच असे कि ते प्रत्येकालाच आकर्षित करते. मात्र सध्याच्या काळात अशीही लोकं आहेत, जे आजपर्यंत कधीही विमानात बसलेले नाहीत. ज्यामुळे विमानातून प्रवास करणे हे अजूनही उत्सुकतेचे मानले जाते. अशा परिस्थितीत जर एखाद्याने विमानच खरेदी केले तर ती खूप मोठी गोष्ट ठरेल.

Spruce Creek - Where Everybody has an Airplane | EaseMyTrip.com

मात्र, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असेही एक ठिकाण आहे, जिथल्या गावातील बहुतेक लोकांकडे स्वतःचे विमान आहे. तसेच ईथे विमान खरेदी करणे म्हणजे अगदी कार खरेदी करण्यासारखेच आहे. इथल्या लोकांकडूनही आपली दैनंदिन काम करण्यासाठी विमानांचाच वापर केला जातो. Fly-In Community

इथे प्रत्येक घराबाहेर विमाने उभी असलेली दिसून येतात. इथल्या घरांची रचना देखील अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, ज्यामध्ये अगदी सहजपणे विमाने पार्क करता येऊ शकतील. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की, या गावातील चित्र नेमकं कसं असेल, कारण ईथे विमानं आणि कार हे एकाच रस्त्यावरून धावताना दिसतात. चला तर मग हे गाव नेमकं कुठे आहे ते जाणून घेऊयात…

7 ideeën over Most Beautiful Hangar Homes

अर्ध्याहून अधिक घरांमध्ये बनवले जातात हँगर्स

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यामधील Spruce Creek असे या गावाचे नाव आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गावामध्ये जवळपास 1,300 घरे आहेत. इथली लोकसंख्या 5,000 आहे. तसेच या गावातील सुमारे 700 घरांमध्ये हँगर्स देखील आहेत. हे जाणून घ्या कि, ज्या जागेमध्ये विमाने उभी केली जातात त्या जागेला हँगर असे म्हणतात. या गावातील अनेक घरांमध्ये गाड्यांसाठी गॅरेजऐवजी हँगर बनवले जातात, जिथे त्यांना आपली विमाने उभी करता येतात. गावापासून हाकेच्या अंतरावर विमानांना टेक ऑफ करण्यासाठी धावपट्टी देखील करण्यात आली आहे.

विमान असणे अगदी सामान्य

काही मीडिया रिपोर्ट्समधील माहितीनुसार, या गावात राहणारी बहुतेक लोकं व्यावसायाने वैमानिक आहेत. म्हणूनच इथे विमान असणे अगदी सामान्य आहे. याशिवाय या गावात वकील, डॉक्टर देखील आहेत. तसेच या लोकांना विमान बाळगण्याची हौस देखील आहे. इथल्या लोकांना विमानाची इतकी आवड आहे की, दर शनिवारी सकाळी ते धावपट्टीवर जमतात आणि स्थानिक विमानतळावर जाऊन नाश्ता करतात. ज्याला ही लोकं aturday Morning Gaggle असे म्हणतात. Fly-In Community

Hangar Homes - Business Aviation Group

मात्र, Spruce Creek हे अमेरिकेतील एकमेव असे ठिकाण नाही जिथे विमान असणे सामान्य आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेतील टेक्सास, वॉशिंग्टन, एरिझोना, कोलोरॅडो आणि कॅलिफोर्नियामध्ये देखील अशी अनेक गावे आहेत, जिथल्या लोकांकडे स्वतःची विमाने आहेत. इथे जवळपास 600 हून जास्त Fly-In Community आहेत, त्यापैकी स्प्रूस क्रीक ही सर्वात मोठी Fly-In Community मानली जाते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.fly-in.com/

हे पण वाचा :
Budget 2023 : विदेशी खेळणी महागणार, खेळण्यांवरील आयात शुल्कात झाली 70% वाढ
IRCTC North East Tour Package : ईशान्येला फिरायला जाण्यासाठी रेल्वे देत आहे सुवर्ण संधी, जाणून घ्या सर्व तपशील
LIC Dhan Varsha Plan मध्ये गुंतवणूक करून मिळवा 10 पट नफा, अशा प्रकारे तपासा यासाठीची पात्रता
आता Driving Licence शिवाय चालवता येणार गाडी !!! सरकारने सुरु केली ‘ही’ सुविधा
IRCTC North East Tour Package : ईशान्येला फिरायला जाण्यासाठी रेल्वे देत आहे सुवर्ण संधी, जाणून घ्या सर्व तपशील