हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्त्वाच्या दस्ताऐवजांमध्ये आधारकार्ड (Aadhar Card) सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आधारकार्ड हे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी अनिवार्य आहे. आपली भारतीय ओळख दाखवण्यासाठी आधारकार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असते. आधारकार्ड एक Identification Document असल्यामुळे आपल्याला ते सतत जवळ बाळगावी लागते. मात्र या आधारकार्डबाबत अनेकांच्या वेगवेगळ्या तक्ररी असतात. त्यातलीच एक तक्रार म्हणजे आधारकार्डवर व्यवस्थित न येणारा फोटो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का आपल्याला हा आधारकार्डवरील फोटो घरबसल्या देखील बदलता येऊ शकतो. यासाठी फक्त खाली दिलेल्या टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला आधार कार्ड वरील आपला लहानपणीचा किंवा खराब झालेला फोटो बदलायचा असेल तर या सर्व टिप्स फॉलो करून आपण आधारकार्डवरील फोटो अपडेट करू शकतो. याची संपूर्ण प्रक्रिया सोपी असली तरी त्यासाठी 100 रुपये आकारले जातात. यासाठी आपल्याला कोणत्याही नेट कॅफे मध्ये जाऊन एका दुसऱ्या व्यक्तीकडून मदत घेण्याची गरज नाही. आपण आपल्या लॅपटॉप वरून देखील आधारकार्डवरील फोटो अपडेट करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया आधारकार्डवरील फोटो अपडेट करण्याची प्रक्रिया.
1) आधारकार्डवरील फोटो बदलण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही UIDIA ओपन करा.
2) या वेबसाईटवर तुम्हाला माय आधार कार्ड पर्याय दिसेल. त्यातील ENROLMENT-UPDATE_Form वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
3) या फॉर्ममध्ये सर्व माहिती तुम्हाला बिन चुकता भरावी लागेल. पुढे, फ़ॉर्मची प्रिटंआउट कडून ती एनरोलमेंट सेंटरवर जमा करावी लागेल.
4) एनरोलमेंट सेंटरवर तुमचे बायोमॅट्रिक डिटेल्स आणि फोटो घेतले जातील.
5) यानंतर तुमच्याकडून शंभर रुपये फी आकारण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला Acknowledgment slip देण्यात येईल.
6) यानंतर साधारण पंधरा दिवसांमध्ये तुमचे आधार कार्ड अपडेट होऊन येईल.
या प्रक्रियेत तुम्हाला फक्त फॉर्म जमा करण्यासाठी आणि फोटो देण्यासाठी आधार सेंटरवर जाण्याची गरज आहे. बाकी सर्व इतर प्रक्रिया तुम्ही घरबसल्या करू शकता. त्यामुळे तुमच्याकडे देखील जुने आधार कार्ड असेल तर तुम्ही ही प्रक्रिया करून आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता. अपडेट केलेल्या आधारकार्डवर तुम्हाला तुमचा चांगला फोटो मिळू शकतो.