हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी तोंड आणि दात तुम्हाला स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेण्यास आवश्यक आहे आणि ही एक अशी उत्तम संपत्ती आहे जी तुम्हाला कायम हसरा चेहरा राखण्यास मदत करते, म्हणून त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आजकाल अनेक कारणांनी काहीजणांना दातांची आणि तोंडाची समस्या उद्भवते. आणि सध्याच्या या महागाईच्या काळात दंतचिकित्सा सुद्धा सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार, दातांच्या समस्येवर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध करणं खूपच स्वस्त आहे .
दातासंदर्भात किंवा तोंडाच्या दुर्गंधीबाबत कोणती समस्या असेल तर त्यावर पहिला उपाय म्हणजे आपण चांगली टूथपेस्ट वापरणे. कारण एखादी चांगली टूथपेस्ट फक्त तुमचे दात अधिक सुंदर, चमकदार किंवा पांढरे बनवत नाहीत तर दात किडण्यापासून ते हिरड्यांना येणारी सूज यासारख्या त्रासावर मात करते. आजकाल बाजारात भरपूर टूथपेस्ट उपलब्ध आहेत परंतु त्यातील आपल्यासाठी योग्य टूथपेस्ट निवडणे हे सोपे काम नाही, परंतु टूथपेस्टमध्ये काय पहावे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुमच्यासाठी सर्वोत्तम निवडणे सोपे होईल. जेव्हा तुम्ही एखादी टूथपेस्ट घेण्याचा विचार करता तेव्हा ज्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते त्याऐवजी एक अशी टूथपेस्ट खरेदी करा जी तुमच्या हिरड्यांच्या समस्या सोडवू शकेल.
जेव्हा आपण चांगल्या पेस्टचा विचार करतो तेव्हा नाव पटकन आपल्या लक्षात येते ते म्हणजे विको वज्रदंती. कारण विको वज्रदंती हे अनेक दंत समस्यांपासून आपलं रक्षण करते. दात किडने, दातांमध्ये फट पडणे, हिरडयांना आलेली सूज, श्वासोच्छवासाची दुर्गंधी, दातदुखी, दात पिवळे पडणे अशा अनेक अडचणींवर विको वज्रदंती हा रामबाण उपाय मानला जातो.
विको वज्रदंती पेस्ट हर्बल आणि आयुर्वेदिक घटकांसह बनविली जाते. विको वज्रदंती पेस्टची ट्यूब इतकी इफेक्टिव्ह बनवणारे घटक निवडण्यासाठी अनेक वर्षे संशोधन करण्यात आले. दातांच्या आणि तोंडाच्या समस्येवर उपाय म्हणून विको वज्रदंती हा एक विश्वासार्ह ब्रँड मानला जातो. पूर्णपणे नैसर्गिक उत्पादन असल्याने अनेक लोक सर्रास या पेस्टचा वापर करतात. विको वज्रदंती पेस्ट 18 आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि साल यांच्या परिपूर्ण मिश्रणातून बनवली आहे ज्यामुळे ती जास्त काळ टिकते सुद्धा. विकोची पेस्टची बाभूळ, बकुळ, जांभूळ, लॉन्ग, मंजिष्ठ, बोर, अक्रोट, अक्कल – कडा, जेष्ठमध, अजवाईन, दालचिनी, खैर, पतंग, हरडा, वज्रदंती, अनंतमुल, आवळा, बेहाडा, चिरफळ, मैफल यापासून बनविली जाते. नैसर्गिक उत्पादन असल्याने विको वज्रदंती पेस्ट हे भारताचे गम एक्सपर्ट होण्याचे आश्वासन देते.