आवश्यक प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरु-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारीला हरवण्यासाठी पूर्वी असणारे निर्बंध जैसे थे असणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होण्यासाठी आणि धोरणाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे निर्देश आणि धोरणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असून संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. यामुळे शासनामार्फत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी यापूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध, अटी, शर्ती जिल्हयात यापुढेही लागू राहणार आहे. त्यानुसार दुपारी 4 नंतर सर्व व्यावसायिक आस्थापनाचे व्यवहार बंद राहतील. याबाबत संबंधित यंत्रणांनी नियंत्रण ठेवावे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले आहे.

ते कोविड उपाय योजनांबाबतच्या जिल्हा कृती दलाची आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी नेमाणे, पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख, अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील दि. 9 ते 15 जुलैमधील कोरोनाबाधीत दर 1.24 टक्के आहे. मात्र, नागरिकांच्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेल्या सर्व उपचार सुविधा सद्यस्थितीत चालु ठेवण्यात आलेल्या असून आरोग्य यंत्रणांनी पूरेशा प्रमाणात ऑक्सीजन उपलब्धता ठेवण्याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्याला आवश्यक प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती ही यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण दिली.