धक्कादायक ! फक्त 20 रुपयांसाठी तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक तरुणाने 20 रुपये देण्यास नकार दिल्यामुळे त्याची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. हि घटना रविवारी मध्यरात्री उल्हासनगर कॅम्प 5 च्या जय जनता कॉलनीमधील परिसरात घडली आहे.

काय आहे प्रकरण
हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अनिल आहुजा असे आहे. अनिल आहुजा हा चहा च्या दुकानामध्ये काम करत होता. तसेच तो आपल्या कुटुंबासोबत जय जनता कॉलनी परिसरात राहतो. आरोपी साहिल मैराळे हा रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जय जनता कॉलनी मधील एका गल्लीत अमली पदार्थांची सेवन करीत नशा करण्यासाठी बसला होता. त्यावेळी साहिलने रस्त्याने जाणाऱ्या अनिलकडे 20 रुपये मागितले. मात्र, अनिलने 20 रुपये देण्यास नकार दिला. याचा साहिलला राग आला. यानंतर त्याने रागाच्या भरात कमरेला असलेला चाकू काढून अनिलच्या अंगावर सपासप वार केले. यानंतर साहिलने घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर स्थानिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अनिलला तपासून मृत घोषित केले. अनिलच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी या घटनेचा पंचनामा करून तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले.या पथकामधील अजय गायकवाड, अजय अहिरे, शेखर पाटील, विक्रम जाधव आणि नवनाथ काळे यांनी 2 तासात आरोपी साहिलला कॅम्प 4 च्या सर्टिफाईट ग्राउंड जवळून ताब्यात घेतले. जेव्हा त्याची अंग झडती घेतली तेव्हा त्याच्या कमरेला चाकू सापडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली असून त्याच्या विरोधात कलम 302,504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment