4 लाख रुपयांच्या नफ्यासाठी SBI मध्ये जमा करा दरमहा फक्त 28 रुपये, याचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकाल हे जाणून घ्या

PIB fact Check
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेली SBI आपल्या ग्राहकांना अनेक फायदे देत आहे. असे अनेक ग्राहक आहेत ज्यांना त्यांच्याबद्दल माहिती नसेल. तुम्ही दरमहा फक्त 28.5 रुपये जमा करून पूर्ण 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. चला तर मग बँकेच्या ‘या’ योजनेबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात…

बँक 4 लाख रुपयांची ‘ही’ सुविधा देत आहे
4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूकीची रक्कम खूप कमी आहे. या दोन योजनांमध्ये फक्त 342 रुपये वार्षिक जमा करावे लागतात.

जन धन खातेधारकांना 2 लाखांचा लाभ फ्रीमध्ये मिळतो
बँकेने जन धन ग्राहकांना ही सुविधा दिली आहे. बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विमा संरक्षणाची सुविधा पुरवत आहे.

PMJJBY ला फक्त 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर 2 लाखांचा लाभ
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीला जीवन संरक्षण मिळते. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) योजना अत्यंत कमी प्रीमियमवर जीवन विमा देते. PMSBY ही केंद्र सरकारची एक योजना आहे, ज्या अंतर्गत खातेधारकाला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

अटल पेन्शन योजना
कमी गुंतवणुकीवर पेन्शनच्या गॅरेंटीसाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपयांच्या पेन्शनची गॅरेंटी देते. सरकारच्या या योजनेमध्ये 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते.