नवी दिल्ली । शनिवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात जीएसटी कलेक्शन पुन्हा एकदा एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला. जीएसटी कलेक्शन एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे असा हा सलग आठवा महिना आहे.
The gross GST revenue collected in May is Rs 1,02,709 crores of which CGST is Rs 17,592 crores, SGST is Rs 22,653 crores, IGST is Rs 53,199 crores and Cess is Rs 9,265 crores: Ministry of Finance pic.twitter.com/7a40clPVA5
— ANI (@ANI) June 5, 2021
ताज्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात सरकारचा जीएसटी कलेक्शन 1,02,709 कोटी रुपये होता. जीएसटी कलेक्शनपैकी CGST 17592 कोटी, SGST 22653 कोटी आणि IGST 53199 कोटी आहे.
एप्रिलमध्ये जीएसटी कलेक्शन 1.41 लाख कोटी रुपये होते
एप्रिलच्या तुलनेत मे महिन्याचा जीएसटी कलेक्शन कमी आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम मेच्या जीएसटी कलेक्शन वरही दिसून येतो. एप्रिल महिन्यात जीएसटी कलेक्शन विक्रमी 1.41 लाख कोटी रुपये होते.
महिना 2019 (कोटींमध्ये जीएसटी) 2020
डिसेंबर 103184 115174
नोव्हेंबर 103491 104963
ऑक्टोबर 95379 105155
सप्टेंबर 91916 95480
ऑगस्ट 98202 86449
जुलै 102083 87422
जून 99939 90917
मे 100289 62151
एप्रिल 113865 32172
महिना वर्ष 2020 (कोटींमध्ये जीएसटी) 2021
जानेवारी 1,10,818 1,19,875
फेब्रुवारी 1,05,361 1,13,143
मार्च 97,590 1,23,902
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group