नवी दिल्ली । केंद्र सरकार संचालित प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana-PMSBY) अंतर्गत तुम्हाला दरमहा एक रुपया किंवा वर्षामध्ये फक्त 12 रुपये जमा करुन 2 लाख रुपयांचा अपघाती विमा (Accidencial Insurance) मिळू शकतो. ही योजना अत्यंत कमी प्रीमियमवर लाईफ इन्शुरन्स देते. चला तर मग त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊयात …
प्रीमियम मेच्या शेवटी दिला जातो
केंद्र सरकारने काही वर्षापूर्वी अत्यंत नाममात्र प्रीमियमवर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू केली होती. या PMSBY चा वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे. आपल्याला हा प्रीमियम मे महिन्याच्या शेवटी द्यावा लागेल. ही रक्कम 31 मे रोजी आपल्या बँक खात्यातून आपोआप वजा केली जाते. जर आपण PMSBY घेतला असेल तर आपण बँक खात्यात तेवढी शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
PMSBY च्या अटी काय आहेत ते जाणून घ्या
PMSBY या योजनेचा लाभ 18-70 वर्षे वयोगटातील लोकं घेऊ शकतात. या योजनेसाठीचा वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे. PMSBY पॉलिसीचा प्रीमियमही थेट बँक खात्यातून वजा केला जातो. ही पॉलिसी खरेदी करताना बँक खाते PMSBY शी जोडले गेले आहे. PMSBY पॉलिसीनुसार, जो ग्राहक विमा खरेदी करतो त्याचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या नॉमिनी व्यक्तीला दोन लाख रुपयांची रक्कम मिळते.
रजिस्ट्रेशन कसे करावे ते जाणून घ्या
आपण या पॉलिसीसाठी बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करू शकता. बँक मित्रदेखील घरोघरी PMSBY डिलिव्हर करीत आहेत. यासाठी विमा एजंटशी संपर्क साधता येईल. सरकारी विमा कंपन्या आणि अनेक खाजगी विमा कंपन्याही या योजनेची विक्री करतात.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा