बच्चू कडू हिंमत असेल तर अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना आणा अन्यथा राजीनामा द्या; रवी राणांचे आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विदर्भ व महाराष्ट्रात दुबार पेरणीचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत महाबीजकडून शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिले गेले. यावरून बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे. तसेच विदर्भ व अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, शासकीय विभागात होत असलेला भ्रष्ठाचार याबाबत बच्चू कडू यांनी युसुफ खान बनून केलेली पडताळणी यावरून राणा यांनी मंत्री बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे.

अपक्ष आमदार रवी राणा यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना आव्हान केले आहे. या आव्हानात ते आमदार राणा यांनी म्हंटले आहे कि, मंत्री बच्चू कडू तुम्हाला युसुफ खान बनण्याचे काहीच कारण नाही. नौटंकी करणे हा तुमचा जुना स्वभाव आहे. नौटंकीचे आंदोलन करून प्रसिद्धी मिळवणे तुम्हाला चांगले जमते. तुमच्या मतदार संघात चाललेलया भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही काहीच बोलत नाहीत. तुम्हाला एकच आव्हान करतो कि, तुम्ही एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यात एक महिन्यात घेऊन. आणि विदर्भातील १२ जिल्ह्यात एक एकदा घेऊन जा. अन्यथा आपल्या राजीनामा द्या.

बच्चू कडू तुम्हाला मी एकच सांगतो कि, मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो. आणि तुम्ही खोटं बोलत आहात आणि रेटून बोल्त आहात. राज्य सरकारने जी फसवी कर्जमाफी केली त्यावरही ते काही बोलले नाही.आज २३ ते २३ शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यात आत्महत्या केली. आणि बच्चू कडू सांगतात कि मुख्यमंत्र्यांवर बोलू नका. अमरावती जिल्ह्यात गरिबांकडून पठाणी वसुली चालू आहे. ज्या मंत्रिमंडळात लाचारी भोगून काम करत आहात. त्यांनी मला नीतिमत्तेची भाषा सांगू नये. तुमची भाषा खरी आहे तर मैदानात उतरावे, असे आव्हान करतो, असे आमदार रवी राणा यांनी म्हंटले आहे.