सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
काही दिवसापासून नदीकाठच्या भागातील शेतकऱ्यांना मुंगुसासारखा प्राणी वावरताना दिसत होता. शेतकऱ्यांनी याची माहिती नदीकाठी वावरणाऱ्या मगरीच्या बंदोबस्तासाठी डिग्रज बंधाऱ्या वरील वन कर्मचारी इकबाल पठाण व ढवळे यांना दिली होती. त्यांनी माग घेता मुंगसासारखा वेगळाच प्राणी नदीच्या काठावर फिरत असलेला दिसला. खात्री करणेसाठी जवळ जाऊन शोध घेतला असता मुंगूस नसून मुंगसासारखा एक वेगळाच प्राणी दिसलेची खात्री झाली.
त्यांनी मोबाईल वर काढलेला फोटोसह माहिती खात्री करणे करणेसाठी मानद वन्यजीव रक्षक ह्यांना पाठवली व ते दुर्मिळ पाणमांजर असल्याची खात्री केली. दुसऱ्या दिवशी सदर परिसरातील शेतकऱ्यांना विचारले असता हा प्राणी काही दिवस झाले इथे दिसत आहे व मागच्या वर्षी पण थोडे दिवस इथे आढळलेची खात्री झाली.याची माहिती मिळताच वाईल्ड लाईफ रेस्कु चे डॉ.अनिरुध्द पाटील आणि सुजित चोपडे यांनी अंकलखोप, हाळभाग येथे या पाणमांजराला कॅमेराबद्ध केले.
डॉक्टर पाटील हे शेतात काम करत असतानाच नदी काठावर हालचाल जाणवली व ओटर सदृश्य प्राणी दिसलेंनी उत्सुकता म्हणून खात्री केली व सोबत असलेल्या कॅमेरा मध्ये त्याचा फोटो घेतला. ह्या पूर्वी आधी असा प्राणी कृष्णेच्या पत्रात आपण पहिला नसलेच त्यांनी सांगीतले. हा प्राणी प्रथमच पहिला व अधिक माहिती साठी वन विभागाला कळविले आहे . ते म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात या दुर्मिळ पाणमांजराचे दर्शन झाले.येथील शेतकरी शीतल चोपडे , राकेश चोपडे आणि तुषार घाडगे यांना याच भागात मागील आठवड्यात 3 पाणमांजर पाहिले असलेच सांगितले आहे.