सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
प्रबळ इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि दृढ संकल्प असेल तर प्रत्येक प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी गावच्या गावकऱ्यांनी असेच काहीसे केले आहे, ज्यानंतर भिलवडी हे गाव देशातील सहावे गाव आणि महाराष्ट्रातील पहिले नियमित राष्ट्रगीत वाजविणारे गाव बनले आहे. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी या गावातील व्यापारी संघटनेने सुरु केलेली राष्ट्रगीताची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून अखंडीतपणे सुरु आहे. रोज सकाळी दिनविशेष.. त्यावर आधारित एक प्रेरणादायी गाणं.. आणि बरोबर ९ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्गीत..
व्यापारी संघटनेच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टिमवरून हे राष्ट्रगीत लावलं जातं आणि सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ त्याचा मान राखतात. धार्मिक स्थळांमध्ये नियमितपणे भजन कीर्तन होणे ही काही नवीन गोष्ट नसली तरी गावात जन गण मन नियमितपणे ऐकायला मिळाले तर गाव देशासारखे भासू लागते. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडीच्या व्यापाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी टोन सेट केला, सकाळचे ९ वाजले आहेत आणि अचानक सायरन वाजतो, त्यानंतर पब्लिक ऍड्रेस सिस्टीममधून राष्ट्रगीत वाजते. लोक थांबतात, लक्ष वेधून घेतात आणि काही कालावधीसाठी स्तब्ध उभे राहतात.
नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकित होण्यासारखेच आहे. मात्र, इथल्या ग्रामस्थांकसाठी हा एक आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयोग आहे. १५ ऑगस्ट २०२० पासून भिलवडी मध्ये PA सिस्टीमद्वारे ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत दररोज वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा काहींना वाटले की देशभक्तीचा उत्साह काही दिवसांत किंवा आठवड्यातून कमी होईल. मात्र, सर्व निष्कर्ष खोटे ठरले. दहा हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह जागृत करून, दररोज राष्ट्रगीत वाजवून, स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला दोन वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्रातील या छोट्याशा गावाने खूप सकारात्मक संदेश दिला आहे.