सांगली | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी होत असून मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या स्थिर राहिली. चोवीस तासात 1 हजार 373 रुग्ण आढळून आले. तर 29 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1265 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 168 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 115, कडेगाव 78, खानापूर 101, पलूस 95, तासगाव 137, जत 220, कवठेमहांकाळ 59, मिरज 183, शिराळा 59 आणि वाळवा तालुक्यात 158 रुग्ण आढळले.
कोरोना संशयित रुग्णांची मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 4 हजार 721 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 1025 पैकी 320 बाधित तर 3708 अँन्टीजेन चाचणीमध्ये 1091 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1373 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 29 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 1 आणि मिरज शहर 5, कुपवाड 2, जत तालुक्यातील 7, तासगाव 4, खानापूर व मिरज तालुक्यातील प्रत्येकी 3, वाळवा 2 आणि आटपाडी व शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांपैकी केवळ 1265 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.
महानगरपालिका क्षेत्रात रुग्णवाढ मंगळवारी कमी झाली. नव्याने 168 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 129 तर मिरज शहरात 39 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 115, कडेगाव 78, खानापूर 101, पलूस 95, तासगाव 137, जत 220, कवठेमहांकाळ 59, मिरज 183, शिराळा 59 आणि वाळवा तालुक्यात 158 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 16, सोलापूर 3, कर्नाटक 9, सातारा जिल्ह्यातील 7 व पुणे येथील एक रुग्ण आढळला. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 93 हजार 465 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 707 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 73 हजार 687 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 17 हजार 71 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 13 हजार 828 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.