सलग तिसऱ्या दिवशी कोरोनारुग्ण 500 च्या पार

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेसाडेपाचशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 540 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 423 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 117 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 53 हजार 649 झाली आहे. आतापर्यंत एकूण 3662 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3106 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 147 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 119 तर ग्रामीणमधील 28 रुग्णांना सुटी देण्यात आली.