मुंबई प्रतिनिधी | शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेले वक्तव्य दुर्देवी होते, त्यामुळे आपल्याला दु:ख झाल्याने नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदराच्या प्रचारास मी जाणार नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला.
शरद पवार यांच्या मनात विखे कुटुंबाबद्दल अजून द्वेष आहे, मी नगरच्या प्रचाराला गेलो तर तो अजून वाढेल म्हणून नगर येथे प्रचाराला जाणार नसल्याचं नेत्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीला माझ्यावर विश्वास नसेल तर मी प्रचार कसा करू असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. शरद पवारांनी हयात नसलेल्या बाळासाहेब विखे पाटलांबद्दल वक्तव्य करणं चुकीचं आहे असे ते म्हणाले.
बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही, ते काही हायकमांड नाहीत असे व्यक्तव्य विखे यांनी केली. काँग्रेसशी माझी बांधिलकी असल्याने ते सांगतील ते मी करेन, तोच निर्णय मला मान्य असेल असे त्यांनी सांगितले. मुलासाठी संघर्ष उभा राहिले असे म्हणणे चुकीचे असल्याचे राधाकृष्ण यांनी म्हटले. नगरमधल्या निवडणुकीत ३ वेळा राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे तिथली जागा काँग्रेसने घेतल्यास फायदा होणार होता.
इतर महत्वाचे –
मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या मातोश्री भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात थरकाप
श्रीनिवास पाटलांनी बांधला उदयनराजे भोसलेंना फेटा, दिड तास चर्चा
उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात