परकीय चलन साठा 56.3 कोटी डॉलर्सने वाढून विक्रमी उच्चांकापर्यंत पोहोचला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 14 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves/Forex Reserves) 56.3 डॉलर्सने वाढून 590.028 अब्ज डॉलरवर पोहोचला. हे ऑलटाइम हायच्या अगदी जवळ पोहोचले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हे कळून येते.

यापूर्वी 7 मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 1.444 अब्ज डॉलर्सने वाढून 589.465 अब्ज डॉलरवर पोचला आहे. 29 जानेवारी 2021 रोजी देशातील परकीय चलन साठा 590.185 अब्ज डॉलर्सच्या ऑलटाइम हायपर्यंत पोहोचला होता.

FCA मध्ये वाढ झाल्यामुळे परकीय चलन साठ्यात वाढ
त्यात असे म्हटले गेले आहे की, 14 मे 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यातील वाढ मुख्यत: परकीय चलन मालमत्ता म्हणजे FCA (Foreign Currency Assets) मध्ये झाली. परकीय चलन साठ्यातील हा एक प्रमुख भाग आहे. रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, आठवड्याभरात विदेशी चलनाची संपत्ती 37.7 कोटी डॉलर्सने वाढून 546.87 अब्ज डॉलरवर गेली आहे.

परकीय चलन मालमत्ता डॉलर मध्ये व्यक्त केली जाते. यामध्ये डॉलर व्यतिरिक्त, युरो, पाउंड आणि येनमधील फरक देखील समाविष्ट आहे. हा एकूण परकीय चलन साठ्याचा भाग आहे.

देशातील सोन्याचे साठेही वाढले
या आठवड्यात देशातील सोन्याचे साठे 17.4 कोटी डॉलरने वाढून 36.654 अब्ज डॉलरवर गेले आहेत. त्याचप्रमाणे, IMF मधील स्पेशल क्लीयरन्स राइट्स (SDR) 20 लाख डॉलर्सने वाढून 1.506 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला. त्याच वेळी, IMF कडे देशाच्या साठ्यांची स्थिती 1 कोटी डॉलर्सने वाढून 4.999 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group