महाबळेश्वरातील वेण्णा लेक परिसरातील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

_ encroachment Venna Lake Mahabaleshwa
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
मिनी कश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीकडे मार्गावरील अतिक्रमणांवर वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. आज दुपारी या मार्गावरील वेण्णा लेक परिसरात असलेल्या टपऱ्या व अनधिकृत बांधकाम वनविभागाने जेसीबीच्या साह्याने हटवले.

महाबळेश्वर व पाचगणी मार्गावर मोठ्या संख्येने पर्यटक ये-जा करत असल्यामुळे अनधिकृतपणे व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात आल्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी अतिक्रमणाची कारवाई केली.

यावेळी पाचगणी मार्गावरील वेण्णा लेक परिसरात असलेली हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या व अनधिकृतपणे करण्यात आलेली बांधकामे जेसीबीच्या माध्यमातून हटवण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण काढून घाईत ते ट्रॅक्टरमध्ये भरून इतरत्र हलवण्यात आली. या ठिकाणी काढण्यात आलेल्या अतिक्रमणानंतर परिसराने पुन्हा मोकळा श्वास घेतला.