चंद्रपूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील झरण वनपरिक्षेत्रात गस्तीवर असताना वनविभागाच्या पथकाने अवैधरित्या सागवानाची तस्करी करण्याला टोळीतील एका आरोपीला रंगेहाथ पकडले तर इतर ४ जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची वनकोठडी सुनावली. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपीच्या माहितीवरून १६ फेब्रुवारीला आणखी ४ जणांना अटक करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.
वनविकास महामंडळाच्या झरण वनपरिक्षेत्र क्रमांक २ मध्ये मागील काही दिवसापासून अवैधरित्या मौल्यवान झाडांची कत्तल करून वाहतूक केली जात आहे. तस्कर मध्यरात्रीच्या सुमारास कत्तल आणि तस्करी करीत असल्याची बाब निदर्शनास येत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी मोटे व त्यांच्या पथकाने १३ फेब्रुवारीला मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास जंगलात धाड टाकून सागवानाचे २१ नाव आणि एक वाहन ताब्यात घेतली दरम्यान धाड पडताच तस्करांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, वनविभागाच्या पथकाने राहुल भोयर वय २४ वर्षे रा. कोठारी याला अटक केली. तर अंधाराचा फायदा घेत ४ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली. आरोपीच्या माहितीवरून १६ फेब्रुवारीला फरार आरोपी प्रमोद खोब्रागडे देवराव झाडे, मनोज शेडमाके इरफान पठाण याला अटक करून गोंडपिपरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची वन कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणांमध्ये आणखी आरोपीचे संख्या वाढण्याची शक्यता आहेत. पुढील तपास सहाय्यक व्यवस्थापक कोपुलवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी मोटे, वनपाल नांदे, दुर्गेवार, वनरक्षक पवार, जाधव, कावळे, मस्के, माऊलीकर, चव्हाण आणि कासारे करीत आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.