Tuesday, June 6, 2023

वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला भीक घातली नाही – सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या आजच्या शक्तिप्रदर्शनावर भाष्य केलं आहे. मुनगंटीवार म्हणाले की ‘वनमंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करत नसून हे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हानच आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करून ते एक प्रकारे आव्हान प्रदर्शनच करत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं पालन करा, गर्दी करू नका, अशा सूचना केल्या होत्या. पण ठाकरे सरकारमधील मंत्रीच आता गर्दी करून कोरोना नियमांची पायमल्ली करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न जुमानता ते पोहरादेवीत येत आहेत. त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भीक घातलेली नाही. त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. असही मुनगंटीवार पुढे म्हणाले आहेत.

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलं. कोरोना रुग्ण प्रचंड प्रमाणावर वाढत असताना देखील एवढ्या संख्येनं समर्थक गोळा करणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील आज विचारला जातोय. त्यामुळे या सगळ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.