यावर्षी Starlink चा इंटरनेट स्पीड दुपटीने वाढणार, एलन मस्कची यासाठी काय योजना आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेस्ला आणि स्पेसएक्स (SpaceX) चा सीईओ एलन मस्क (Tesla CEO elon musk) म्हणाले की,” स्टारलिंकचा इंटरनेट स्पीड या वर्षात वाढून दुप्पट होणार आहे. जगभरातील दररोजच्या कामांमध्ये लाखो लोकांसाठी स्वस्त सुविधा उपलब्ध करुन देणारी स्टारलिंक सर्व्हिस आपल्या इंटरनेट स्पीड (Internet speed) वाढण्याचे काम करत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार एलन मास्क ने स्पेस टेक्नॉलॉजी प्रोग्रॅम अंतर्गत आतापर्यंत 1000 सॅटेलाइट स्पेसमध्ये लॉन्च केलेल्या आहेत. होय या सर्व सॅटेलाइट स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिससाठी काम करत आहेत.

सध्याच्या Starlink योजनेमध्ये 50 ते 150Mbps दरम्यान स्पीड देण्याचा दावा केला जात आहे. त्यासह कंपनीच्या 12 हजार सॅटेलाइट वर हाय स्पीड इंटरनेट देण्याची योजना आहे. कंपनीने आधी आपल्या 1000 पेक्षा जास्त स्टारलिंक उपग्रहांच्या ऑर्विटमध्ये नेटवर्क स्थापित केले आहे.

मस्क ने ट्वीट द्वारे दिली माहिती
मस्क यांनी सोमवारी रात्री केलेल्या एका ट्वीटमध्ये सांगितले, “या वर्षी स्टारलिंकची गति वाढून 300Mb/s होणार आहे.” त्यांनी सांगितले की, “स्टारलिंकची ही योजना पृथ्वीवरील अनेक भागांना कव्हर करेल. मस्क ने सांगितले, “हे लक्षात घेण्यासारखे आहे कि दाट शहरी भागात सेल्युलरमध्ये याचा अधिक फायदा होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, Elon Musk ने भारत सरकारच्या सॅटेलाइट बेस्ड ब्रॉडबँड टेक्नोलॉजीच्या भारता मधील संचालना साठी परवानगी मागितली होत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने भारतातील ब्रॉडबँड कनेक्टिविटीच्या प्रमोशनसाठी मागील वर्षी ऑगस्टमध्ये एक कंसल्टेशन पेपर जारी केला होता.

भारत मध्ये 700 मिलियन इंटरनेट यूजर्स आहेत
भारतात इंटरनेट यूजर्सची मोठी बाजारपेठ आहे, ज्यामध्ये 700 मिलियन इंटरनेट सब्सक्राइबर्स आहेत. ज्यांची संख्या सन 2025 पर्यंत वाढून 974 मिलियन होण्याची अपेक्षा आहे. भारतात सध्या सरासरी इंटरनेट स्पीड 12 एमबीपीएस आहे. तथापि, 5G भारतात येण्याने इंटरनेट स्पीड वाढण्याची आशा आहे. SpaceX च्या स्टारलिंक प्रोजेक्ट द्वारे 150 Mbps पर्यंत स्पीड दिला जाऊ शकणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment