व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कौतुकास्पद ! वनकर्मचाऱ्याने तहानलेल्या बिबट्याच्या बछड्यांना बाटलीने पाजलं पाणी

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – वाढती जंगलतोड आणि सिमेंटच्या जंगलामुळे जंगली प्राणी मानववस्तीकडे वळू लागले आहेत. यामुळे लोकांमध्ये जंगली प्राण्यांविषयी भीती आहे. बिबट्या, चित्ता, वाघ, सिंह यांसारखे प्राणी दिसले तरी माणसाच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र यामध्ये सुद्धा अशा काही घटना असतात ज्या मनाला आनंद देतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
अकोले तालुक्यातील टाकळीत आढळून आलेल्या तीन बिबट्याच्या बछड्यांना (leopard cubs) वनकर्मचारी पाणी पाजत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या आगळ्यावेगळ्या व्हि़डिओची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. सध्या तापमानाने उच्चांक गाठला असून अकोले तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. अशा परिस्थितीत जंगली प्राणी, पशु-पक्षी हेदेखील पाण्याच्या शोधात आहेत. यातीलच हे बछडेही(leopard cubs) होते. हे बछडे पाण्याविना व्याकुळ झालेले होते.

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील टाकळी गावच्या जंगलात वनकर्मचारी अशोक घुले आणि त्यांचे सहकारी जंगलात खड्डे खोदण्याचे काम करत होते. यावेळी त्यांना बिबट्याच्या बछड्यांचा (leopard cubs)आवाज आल्याने ते गुहेच्या दिशेने गेले. त्याठिकाणी त्यांना बिबट्याचे 3 बछडे आढळून आले. अशोक घुले यांनी ही माहिती वनक्षेत्रपाल प्रदिप कदम यांना दिल्यानंतर कदम यांनी बछड्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. यानंतर कर्मचारी अशोक घुले यांनी 3 महिन्याच्या बछड्यांना एका भांड्यात पाणी उपलब्ध करुन दिले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात शूट करण्यात आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. घुले यांच्या या धकडाकेबाज तसेच डेरिंगबाज कामाचे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल