औरंगाबाद – औरंगाबादेत पीठ लाईन साठी जागा नसल्याचे कारण पुढे करून जाण्यातच पीटलाईन करण्याला गती दिली जात आहे. पण त्याच वेळी औरंगाबादेतही पीटलाईन होईल असे केवळ वर सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात औरंगाबादेतील पीटलाईन साठी आणि जागेसाठी रेल्वे प्रशासनाकडून काहीही होत नसल्याचे म्हणत रेल्वे संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
औरंगाबाद येथील चिकलठाणा येथे पिटलाईन करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, जागा अपुरी असल्यामुळे जालना येथे पिटलाईन करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याची माहिती पुन्हा एकदा एका पत्राद्वारे समोर आली आहे. त्यामुळे औरंगाबादेत पीटलाईन साठी जागा नसल्याचा खटाटोप केला जात असल्याची ओरड रेल्वे संघटनांकडून होत आहे. औरंगाबादेतील पीटलाईन नावालाच मंजूर असून जालन्याने पीटलाईनच्या बाबतीत काहीशी गती पकडली आहे. जालन्यात कोच देखभाल सुविधेच्या विकासासह प्राथमिक विद्युत कामे, विद्युत युनिटचे स्थलांतर आदी कामांसाठी काही दिवसांपूर्वीच निविदा प्रसिद्ध झाली.
जालन्यात पीटलाईन होण्यासाठी रेल्वेची यंत्रणा व्यस्त झाली आहे. परंतु औरंगाबादेतील पिटलाईनचा रेल्वे प्रशासनाला विसर पडल्याची परिस्थिती दिसत आहे.