काबुल/बर्लिन । तालिबानने अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनीसह अनेक राजकारणी आणि मंत्री देश सोडून पळून गेले आहेत. यापैकी अनेक लोकांना आता सामान्य लोकांसारखे जीवन जगण्यास भाग पाडले आहे. नुकतेच अफगाणिस्तानच्या माजी परिवहन मंत्र्याचे एक छायाचित्र समोर आले आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. माजी मंत्री सय्यद अहमद शाह सादत यांनी जर्मनीच्या लीपझिग शहरात आश्रय घेतला आहे, सय्यद अहमद गेल्या 2 महिन्यांपासून येथे पिझ्झा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत.
हे छायाचित्र पाहून विश्वास बसणे कठीण होते की, नेहमी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कडक पहाऱ्यात सूट बूटमध्ये राहणारे सय्यद अहमद शाह सादत यांना आज पिझ्झा डिलीव्हर करणे भाग पडले आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, सय्यद अहमद शाह सादत डिसेंबर 2020 मध्ये काबूल सोडून जर्मनीला पळून गेले. सद्दत हे उच्चशिक्षित आहे, त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कम्युनिकेशनमध्ये एमएससी केले आहे. तो इलेक्ट्रिकल इंजिनिअर देखील आहे.
सय्यद अहमद शाह यांनी जगातील 13 मोठ्या शहरांमध्ये 23 वर्षे विविध प्रकारची कामे केली आहेत. पण कदाचित देश सोडल्यानंतर नशिबानेही त्यांची साथ सोडली. इतके शिक्षण घेऊनही त्यांना घरोघरी पिझ्झा पोहोचवावा लागत आहे.
सय्यद अहमद शाह एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की,” सुरुवातीच्या काळात मला या शहरात राहण्यासाठी कोणतेही काम मिळत नव्हते, कारण मला जर्मन भाषा येत नाही. सध्या मी फक्त जर्मन भाषा शिकण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी जॉब करत आहे. या नोकरीच्या माध्यमातून, मी शहरातील विविध भागांना भेट देत आहे आणि लोकांना भेटत आहे, जेणेकरून येत्या काही दिवसांत मी स्वतःला सुधारू शकेन आणि दुसरी नोकरी मिळवू शकेन.”
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यापासून बँकिंग आणि आरोग्य सेवांची स्थिती वाईट आहे. ATM रिकामे आहेत. खाण्यापिण्यापासून प्रत्येक जीवनावश्यक वस्तूच्या किमती तीन पटीने वाढल्या आहेत. मोठ्या संख्येने महिला नर्सेस कामावर परतल्या नाहीत. WHO ने म्हटले आहे की,” काबूल विमानतळावर लादलेल्या निर्बंधांमुळे 500 टनांपेक्षा जास्त मेडिकल सप्लाय अफगाणिस्तानात पोहोचत नाही.