संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेनंतर रावत यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात होते. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

कुन्नुरमध्ये झालेल्या अपघातानंतर सीडीएस बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील आर्म्ड फोर्सचं महाविद्यालयात एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जाणार होते. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र कुमार, एल/एनके विवेक कुमार, एल/एनके बी साई तेजा, हवालदार सतपाल हे हेलिकॉप्टरमध्ये होते. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्रीयमंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी लष्कर अधिकाऱ्यांशी बैठक घेत या दुर्घटनेची माहिती घेतली. तसेच या दुर्घटनेची माहिती घेतल्यानंतर मंत्री सिह यांनी अधिकारी रावत यांच्या घरी जाऊन सुमारे पंधरा मिनिटे कुटूंबीयांशी चर्चा केली होती.

असा होता रावत यांचा जीवनप्रवास –

जनरल बिपीन रावत यांचा जन्म उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील चौहान राजपूत कुटुंबात 1963 साली झाला. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल लक्ष्मण सिंह रावत होते, जे सैन्यातून या पदावरून निवृत्त झाले. रावत यांनी 1978 मध्ये 11 व्या गोरखा रायफलच्या पाचव्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. रावत यांनी डेहराडूनमधील कॅंब्रियन हॉल स्कूल, शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूल आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे शिक्षण घेतले, जिथे त्यांनी ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ प्राप्त केली. ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि फोर्ट लीव्हनवर्थ, यूएसए येथील हायर कमांड कोर्सचे पदवीधर आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून डिफेन्स स्टडीज, डिप्लोमा इन मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन कॉम्प्युटर स्टडीज देखील केले आहे.