कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री साठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर या निर्णयावरून विरोधकांनी सरकार वर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अद्याप वाईन बाबत कोणताही निर्णय झाला नसून हा निर्णय जनतेसमोर ठेवण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, दारू आणि वाईन यामध्ये फरक आहे. विशेषतः लाल रंगाची वाईन ही शरीरासाठी उपयुक्त आहे असे बऱ्याच लोकांचे म्हणने आहे. मात्र तरीही अद्याप सरकार कडून घेण्यात आला नाही. हा विषय जनतेसमोर ठेवण्यात आला आहे आणि त्यांना आपली मते कळवा अस ठरवलं आहे. त्यामुळे याला पाठींबा की विरोध करायचा याबाबत लोकांना अधिकार आहे असे म्हणत अद्याप सरकार कडून निर्णय झालेला नाही असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मोदींनी महाराष्ट्र काँग्रेस वर कोरोना पसरवण्याच्या केलेल्या आरोपाचाही समाचार घेतला. मोदींचे हे वक्तव्य वैफल्य आणि नैराश्याचे लक्षण आहे. कोरोना सुरु झाला तेव्हा मजूराना घरी जाण्यासाठी सेवाभावी संस्था आणि सरकारणी मदत करण्याची भूमिका घेतली. कोरोनाला सुरवात झाल्यानंतर मोदी सरकारला मजूराना घरी पोहचवण्यात अपयश आले. मजून आपल्या मुलाबाळाना घेवून पायी आपल्या घरी जाताना संपूर्ण जगाने पाहिले. भारताची नाचक्की झाली. मजूरानी घरी जावू नये आहे तिथेच रहावे असं त्यावेळी मत होते. ते अत्यंत कृरतेचे लक्षण होते. त्यामुळे पंतप्रधानांचे वक्तव्य चिड आणणारे असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.