अरुण जेटली यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. अनेक आजरांनी त्यांना ग्रासल्याने त्यांचे शरीर क्षीण झाले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मागच्या काही दिवसापूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तुमच्या नव्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे असणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर

१४ मे २०१८ रोजी अरुण जेटली यांच्यावर किडनी ट्रान्सप्लंटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते १०० दिवस अर्थ मंत्रालयात आलेच नव्हते. त्यांच्याजागी त्यावेळी पियुष गोयल यांची हंगामी अर्थ मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली होती. अरुण जेटली यांच्यावर २०१४ साली बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे त्यांचे वजन सतत वाढत जात होते. त्यामुळे त्यांच्यावर हि शस्त्रक्रिया केली होती. मागील काही महिन्यात त्यांना कॅन्सरचे देखील निदान झाले होते. त्या संबधी उचपार करण्यासाठी ते परदेशात देखील केले होते.

२५ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यावर अजित पवार म्हणतात

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मंत्रिमंडळात आपला समावेश करू नये. कारण प्रकृती एवढी अस्वस्थ आहे की १८ महिन्यापासून मी सतत मृत्यूशी लढा देत आहे असे अरुण जेटली यांनी पत्र लिहून नरेंद्र मोदी यांना कळवले होते. त्यांच्या या विनंती नंतर त्यांचा समावेश मंत्री मंडळात करण्यात आला नव्हता. अरुण जेटली हे सध्या राज्यसभेचे सदस्य होते. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावरच अरुण जेटली यांनी राजकारणात एवढी उंची कमावली होती. ते राज्यसभेत भाषण देण्यासाठी उभा राहिले की पत्रकार गॅलरीकडे धावत असत कारण त्यांना अरुण जेटली बोलू लागले की त्यांचे भाषण चुकवू वाटत नसे. राजकारणा सोबत अरुण जेटली यांनी वकिलीत देखील चांगलेच नाव कमावले होते. ते १९८७ पासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते. त्यांच्या जाण्याने भाजपने एक हुशार चेहरा गमावला असून त्यांचे निधन भाजपसाठी अत्यंत दुःखदायक आहे.

ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री म्हणतात

सामानातून शिवसेनेची सरकारवर जहरी टीका

मोदी-शहांची पण चौकशी झाली पाहिजे – खा. संजय राऊत

खा. उदयनराजे भोसले यांची भाजप प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

Leave a Comment