मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांची हत्या करण्यात आली आहे. जपान येथील नारा शहरात जनतेला संभोधित करताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते जागीच कोसळले. आणि त्यांचे निधन झाले.
NHK is broadcasting the moment that Japanese Former PM Shinzo Abe was shot from behind. Video does not show the shooter, just the puff of smoke. pic.twitter.com/4CNW1JTmvn
— GMI (@Global_Mil_Info) July 8, 2022
हाती आलेल्या वृत्तानुसार, शिंजो आबे (Shinzo Abe) हे नारो या शहरात भाषण करत होते. त्यावेळी आरोपीनं पाठीमागून त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. जपानी पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे.
https://twitter.com/morpheus7701/status/1545241631414452225
शिंजो आबे कोण आहेत?
शिंजो आबे (Shinzo Abe) हे जपानचे माजी पंतप्रधान होते. जपानच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधान पद त्यांनी भूषवलं आहे. 2006 ते 2007 यानंतर 2012 ते 2020 असा प्रदीर्घ काळ ते जपानच्या पंतप्रधानपदी होते. शिंजो आबे यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 साली झाला. जपानच्या लिबरल डेमोक्रेटीक पार्टीचे म्हणजेच एलडीपीचे ते अध्यक्ष आहेत. शिंजो आबे (Shinzo Abe) हे 71 वर्षांचे होते. त्यांचा जन्म टोकीयोमध्ये एका राजकीय कुटुंबातच झाला होता. शिंजो आबे यांनी भारताशी संबंध चांगले करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2020 साली प्रकृतीच्या कारणामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार