ड्रग्ससारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची पाठराखण लाजिरवाणी; सुधीर मुनगुंटीवारांची शिवसेनेवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आलेली आहे. आर्यनला वाचवण्यासाठी शिवसेनेचे नेते किरोश तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. असल्याने यावरून भाजप नेते तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “ड्रग्स सारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची शिवसेनेकडून पाठराखण केली जाणे हि खूप लाजिरवाणी गोष्ट असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

माजी मंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे वकील या प्रकरणात आर्यन खानची बाजू मांडतील. ड्रग्स सारख्या संवेदनशील विषयावर शिवसेनेने आर्यन खानची पाठराखण करणे हि लाजिरवाणी बाब आहे. मात्र, याचिकाकर्त्यांना आर्यन निर्दोष असल्याचे कुणी सांगितले? त्यांना सहावे इंद्रिय आहे का?

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण केले आहे. अशा परिस्थितीत मादक पदार्थांना आयुर्वेदिक औषधी असल्याचा शोध लावणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता हजारो वर्षे विसरणार नाही, असी टीकाही मुनगंटीवार केली आहे. आता मुनगंटीवार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडून काय उत्तर दिले जाणार हे पहावे लागणार आहे.