नवी दिल्ली । गँगरेप प्रकरणात माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती हे दोषी आढळले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त आशिष शुक्ला आणि अशोक तिवारी हे देखील दोषी ठरले आहेत. गायत्री प्रसाद प्रजापती हे यूपी सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत. चित्रकूट मधील एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर गॅंग रेप केल्याचा आरोप केला होता.
या तिघांना गॅंग रेप आणि पॉक्सो ऍक्ट अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. १२ नोव्हेंबर रोजी न्यायालयाकडून त्यांच्या शिक्षेबाबत घोषणा केली जाईल. तसेच या प्रकरणात विकास वर्मा, अमरेंद्र सिंह उर्फ पिंटू, चंद्रपाल, रुपेशवर उर्फ रुपेश यांना सोडण्यात आलेले आहे.
याप्रकरणाविषयी जाणून घ्या
गायत्री प्रजापतीने बुधवारी सुनावणी टाळण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. त्यांच्या वतीने प्रकरणाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी देखील करण्यात येत होती. अशातच या प्रकरणाला दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करावे यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका देखील फेटाळण्यात आली. त्यांनी जमीन मिळवण्यासाठी हाय कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टाचा तीन वेळा दरवाजा ठोदेखील ठावला होता.
४ वर्ष चाललेल्या प्रकरणात एकूण १७ साक्षीदार हजर करण्यात आले. जिल्हा शासकीय अधिवक्ता मनोज त्रिपाठी यांच्यानुसार प्रजापतीने हे प्रकरण ताणायचा आणि त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. अखेर पिडीताच्या वकील कडून देण्यात आलेले पुरावे, १७ साक्षीदार आणि पोलिसांची चार्जशीट या आधारे त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
१८ फेब्रुवारी २०१७ रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने लखनौच्या गौतमपल्ली ठाण्यामध्ये सपा सरकारच्या मध्ये खाणमंत्री राहिलेले गायत्री प्रसाद प्रजापती यांच्यासमवेत गँगरेप आणि जीवे मारण्याची धमकी आणि पॉक्सो एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ३ जून २०१७ रोजी या प्रकरणात ८२४ पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली.
नक्की प्रकरण काय आहे ?
समाजवादी सरकार मध्ये खाणमंत्री राहिलेले गायत्री प्रजापती आणि अन्य सहा लोकांवर चित्रकूट मधील एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर गॅंग रेप केल्याचा आरोप केला होता. या महिलेचे म्हणणे होते कि, ती त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेली होती. त्यावेळी त्या मंत्रीने आणि त्यांच्या साथीदारांनी तिला गुंगीचे औषध दिले आणि तिच्या मुलीवर गँगरेप केला. जेव्हा महिलेने त्यांना पोलिसात तक्रार करण्याविषयी सांगितले तेव्हा त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडितेला या प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावे लागले. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर लखनौच्या गौतमपल्ली ठाण्यामध्ये त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आला. FIR दाखल झाल्यानंतर गायत्री प्रजापती आणि त्यांच्या साथीदारांना लखनौ पोलिसांनी आलमबाग परिसरातून अटक करण्यात आली.