राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राचे माजी मंत्री जखमी; गंभीर दुखापत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या तेलंगणात भारत जोडी यात्रा सुरू आहे. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी वेगवेगळ्या समुदायातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेत आहेत. सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी राहुल यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेत हैदराबाद येथे माजी मंत्री नितीन राऊत यांना धक्का लागला आणि तोल जाऊन ते खाली कोसळले. यामुळे त्यांचा डावा डोळा जखमी झाला असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर दीक्षा नितीन राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. दीक्षा राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, राहुल गांधी यांच्या हैद्राबाद येथील भारत जोडो यात्रेत त्यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी होती. यावेळी चालत असताना राऊत यांना पाठीमागून धक्का लागला आणि ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे, असे ट्विटमध्ये दीक्षा यांनी म्हंटले आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरु झाली आहे. आतापर्यंत तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांतून ही यात्रा झाली असून या संपूर्ण यात्रेत राहुल गांधी 3 हजार 750 किमीचा प्रवास करत आहेत. एकूण १२ राज्यांतून ही यात्रा जाणार आहे.