काँग्रेसच्या माजी आमदारास अटक; भरसभेत पोलिसांना केली शिवीगाळ

congress
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक नेते भावनेच्या भरात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. टीका करताना केल्या गेलेल्या वक्तव्यानंतर त्यांना पोलिसांच्या कारवाईसमोर जावे लागत आहे. अशीच वक्तव्य व शिवीगाळ काँग्रेसचे माजी आमदारआसिफ मोहम्मद खान यांनी पोलिसांना केले आहे. त्यांचा शिवीगाळ करतानाचा एका व्हिडिओ व्हायरल झाला असून एसआयसह दोन दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शाहीनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसचे माजी आमदार आणि नगरसेवक आसिफ खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आसिफ खान हे लोकांपुढे भाषण करत असताना अचानक आक्रमक झाले. यावेळी त्यांनी एका उपनिरीक्षकाला शिवीगाळ केली तसेच त्याला मारहाणही केली. शिवाय, असिफ खान यांनी पोलिस कर्मचाऱ्याला सर्वांसमोर धडा शिकवण्याची धमकी दिली.

मोठ्या संख्येने जमलेल्या जमावातून व आसिफ खान आणि त्यांच्या समर्थकांतून दोन पोलिसांनी आपला जीव वाचवून तेथून पळ काढला. आसिफ खान यांच्या या कृत्यानंतर त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्यांना अटक करण्यात आली.