जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत चमत्कार करणार, माजी आमदार सुभाष झांबड यांचा गौप्यस्फोट

औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे, आता अध्यक्ष पदाबाबत आपण चमत्कार करणार असल्याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे माजी आमदार सुभाष झांबड यांनी बुधवारी सांगितले.

शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण हे माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी स्थापन केलेल्या शेतकरी विकास पॅनल बराेबर सामील झाले हाेते. दरम्यान हरिभाऊ बागडे हे संचालक पदासाठी निवडून आले नाही आणि दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसनेचे माजी खासदार तथा नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेल उभे केले होते.

हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलकडून या अगोदर मंत्री अब्दुल सत्तार यांनी नितीन पाटील हेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान आता काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच चंद्रकांत खैरे यांचे पॅनल आता काय निर्णय घेणार यावर सर्वच राजकीय तसेच विश्वेश्लक देखील राजकीय आखाडे बांधत होते. माजी आमदार सुभाष झांबड यांनी अध्यक्षपदाबाबत चमत्कार करणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस जशी विधानसभा निवडणुकीनंतर एक झाली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केले तसा बॉम्ब फोडणार का, असाही अंदाज काही राजकीय विश्लेशकांनी व्यक्त केला आहे. आणि असे नाही झाले तर भाजप आणि शिवसेना हे देखील एकत्र येवून निवडून आलेल्या संचालकांची पळवापळवी करुन पुन्हा अध्यक्ष करते की काय, अशी परिस्थिती देखील होवू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like