‘त्या’ 12 आमदारांवर राज्यपालांना पीएचडी करायची आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीसाठीची यादी पाठवून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. त्या 12 नावांचं काय झालंय, राजभवनमधून त्याचा खुलासा व्हायला हवा. ते अभ्यास करतायंत ते ठिकंय, पण यातून काय त्यांना पीएचडी वगैरे मिळवायची आहे का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

राज्यपाल हे पद संवैधानिक आहेत. त्या पदाचा मान राखला पाहिजे, हे मला सुद्धा कळतं. पण राज्यपालांचा मान विरोधकांनीच ठेवला नाही. राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणारच. जोपर्यंत राज्यपाल 12 सदस्यांच्या नावाला मंजुरी देत नाही. तोपर्यंत आम्ही टीका करतच राहणार, असंही ते म्हणाले

विरोधकांना भेटायचंच असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं. राज्यपालांना कशाला भेटता? राज्यपाल काय राज्य चालवतात का? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांना भेटा. तुमचं म्हणणं त्यांच्यापुढे मांडा. चर्चा करा. त्यातून संवाद निर्माण होईल, असंही ते म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment