पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या भारतात ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती करण्याचा जणू फॅडच आला आहे. आजकाल सगळेच दिग्दर्शक ऐतिहासिक सिनेमा बनवण्याच्या मागे लागले आहेत. मात्र हे सिनेमे कुठलाही अभ्यास न करता अर्धवट ज्ञानाच्या आधारावर सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अतिशय आक्रस्ताळेपणाने ऐतिहासिक सिनेमांची मोडतोड करून आपल्या समोर सादर केले जात आहेत.
या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजी छत्रपती (Sambhaji Raje) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ‘हरहर महादेव’ तसेच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी निर्माते व दिग्दर्शकांनी इतिहासाची मोडतोड केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दमदेखील दिला. त्यानंतर आता संभाजीराजेंच्या (Sambhaji Raje) निर्णयाला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाकडून समर्थन देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाची भूमिका काय?
भविष्यात केंद्राने व राज्य सरकारने चित्रपट सेंसोर बोर्डावर ऐतिहासिक संशोधक मंडळावर सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी, याबाबतीतलं निवेदन राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाकडून राज्यसरकारला देण्यात येणार आहे. जेणेकरून भावी पिढीसाठी मोडतोड झालेला व जाणीवपूर्वक केलेला इतिहास हे व्यावसायिक लोक मांडणार नाहीत. तसेच राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील हे छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार आहेत.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय