माझ्या बापाच्या हत्येमागचा खरा मास्टरमाइंड कोण?; पूनम महाजन यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते प्रमोद महाजन यांची त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी त्यांच्या राहत्या घरी 2005 साली हत्या केली होती. महाजनांच्या खुनाचा मुद्दा त्यांच्या कन्या, खासदार पूनम महाजन यांनी उपस्थित केला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “माझ्या वडिलांना कोणी मारलं हे मला माहीत आहे. पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता? ज्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते सत्तेत होते तेव्हा त्यांनी हत्येमागचा मास्टरमाइंड का शोधला नाही? असा सवाल भाजपच्या नेत्या, खासदार पूनम महाजन यांनी केला.

खा. पूनम महाजन यांनी वांद्रे येथील सभेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागले. त्या म्हणाल्या की, “मला माहीत आहे माझ्या बापाला कोणी मारलं. प्रत्येकवेळी तो प्रश्न निर्माण करून फरक पडत नाही. मी शिवसेना-भाजप-रिपाइंच्या युतीतून 2014 आणि 2019 मध्ये खासदार झाले. त्याचा मला अभिमान आहे. मात्र, आमच्या मित्रपक्षाला जनमताचा का अभिमान नव्हता?

ज्यावेळी दोन भावात, मित्रांमधील युतीत भांडणे झाली. हे महाभारत घडवणारे शकुनी कोण कोण होते? ते तुम्हाला माहितच असेल. या शकुनींनी महाभारत रचलं आणि स्वत: सत्तेवर जाऊन बसले, अशी टीका महाजन यांनी केली.

शरद पवारांचा केला होता शकुनीमामा असा उल्लेख

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शकुनी मामा म्हणून टीका केली होती. तेव्हा अजित पवार यांनी पूनम महाजन यांच्यावर टीका करत तुझ्या चुलत्याने तुझ्या बापाला का मारले, दोघेही एकाच आईचे पुत्र होते, तरी एका भावाने दुसर्‍या भावाला का मारले असा सवाल केला होता. आता मुंबई महानगरपलिकेच्या निवडणुकीपूर्वी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.