पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचं निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचे नुकतेच दीर्घ आजारानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.

1999 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी लष्कराच्या बळावर पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती. परवेझ मुशर्रफ यांनी 2001 ते 2008 दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून कार्यभार पाहिला होता. महाभियोगाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मुशर्रफ यांनी 2008 मध्ये आपल्या राष्ट्रपतीपदाचा त्यांनी राजीनामाही दिला. मुशर्रफ यांना 2019 मध्ये देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानचे आर्मी प्रमुख ही होते. भारताविरुद्ध झालेल्या कारगिल युद्धासाठी मुशर्रफ यांना जबाबदार धरण्यात आले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत होते. परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला होता.