गर्भवती वनरक्षक महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या माजी सरपंचास अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मला न विचारता वन मजूर प्राण्यांच्या जनगननेसाठी का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी ही मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिसांत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. या मारहाणीच्या घटनेने जिल्ह्यात आणि राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. सातारा पोलीसांनी आरोपीस मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास शिरवळ येथून अटक केली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा अजित बोऱ्हाडे यांनी दिली.

सातारा तालुक्यातील पळसवडे गावच्या माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना घडलीआहे‌. वनविभागाच्या महिला कर्मचारी या तीन महिन्याच्या गर्भवती असून त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घडलेल्या प्रकाराची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती स्वतः या पिडीत कर्मचाऱ्यांनी दिली आहे. पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक प्रकार साता-यातील पळसावडे येथे घडला आहे.

संशयित आरोपी रामचंद्र जानकर याच्यावर ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ या कलमांनुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचं अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोराडे यांनी सांगितलं. या घटनेचे पडसाद संपुर्ण राज्यभर उमटले असुन घडलेल्या घटणेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.