धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणासह माजी सरपंचाने केली आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करत लातूर जिल्हयातील महेश कदम या तरुणाने आणि आळंदी येथील व्यंकट नरसिंग ढोपरे माजी सरपंचाने आत्महत्या केली आहे. “दुष्काळ जगू देत नाही आणिआरक्षण शिकू देत नाही,” असे म्हणत आज 26 वर्षीय महेशने आपले आयुष्य संपवले आहे. तर, 65 वर्षीय व्यंकट नरसिंग ढोपरे यांनी इंद्रायणी नदीत उडी मारून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. तर सरकार अजून किती मराठ्यांचा जीव घेणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

महेश कदम हा लातूर जिल्हयातील ढाळेगाव येथील रहिवासी होता. आत्महत्या करण्यापूर्वी महेशने व्हाट्सअपवर एक स्टोरी ठेवली होती. या स्टोरीमध्ये त्यांने “दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही,” असे म्हणले होते. यानंतर काही वेळातच त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. महेशच्या घरची परिस्थिती चांगली आहे. तो गेल्या अनेक काळापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होता. मात्र सरकार आपल्या समाजाला आरक्षण देत नाही, या मुद्द्याला घेऊन महेश गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होता. शेवटी नैराश्यात येऊन आज महेशने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

तर दुसऱ्या बाजूला शुक्रवारी आळंदी येथे रात्री आठच्या सुमारास माजी सरपंच व्यंकट नरसिंग ढोपरे यांनी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी व्यंकट यांनी मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी चिट्टी लिहून ठेवली होती. व्यंकट ढोपरे हे लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा या गावचे सरपंच होते. शुक्रवारी दुपारच्या वेळेस व्यंकट आपल्या घरातून बाहेर पडले होते. यानंतर, कपडे धुताना घरच्यांना त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. ज्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर व्यंकट यांचे काही साहित्य इंद्रायणी नदीच्या काठेवर सापडले. याच्या आधारावरच अग्निशामक दलाने ढोपरे यांचा इंद्रायणी नदीपात्रात शोध सुरू केला. शेवटी शनिवारी दुपारी ढोपरे यांचा मृतदेह नदीत मिळाला.