पाटणमध्ये BRS चा उमेदवार ठरला ! ‘नांगरधारी शेतकऱ्याच्या’ लेकीमुळे सामना होणार तिरंगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) मोठा गाजावाजा करत महाराष्ट्रात एन्ट्री केल्यानंतर अनेक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते BRS मध्ये प्रवेश करत आहेत. सातारा जिल्ह्यात देखील या पक्षाचे नेटवर्क स्ट्राँग होत चालले आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात सर्वात महत्वाची घटना घडली असून पाटण विधानसभा क्षेत्रातील माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत BRS मध्ये प्रवेश केला आहे. पाटण विधानसभेच्या उमेदवार म्हणून त्यांचे नाव BRS ने निश्चित केल्याने पाटणमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

कोण आहेत सुरेखा पाटील?

महाराष्ट्रात 1977 मध्ये गाजलेल्या माळशिरस विधानसभा निवडणुकीत ‘नांगरधारी शेतकरी’ चिन्हावर निवडणूक लढवून सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा ऐतिहासिक पराभव केलेले माजी आमदार दिवंगत शामराव पाटील यांच्या सुरेखा पाटील या कन्या तसेच सोलापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील यांच्या त्या भगिणी आहेत. पाटण विधानसभा मतदार संघातील सुपने गाव हे त्यांचे सासर आहे. डॉ. महेंद्र पाटील यांच्या त्या पत्नी असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अपक्ष लढून जिंकली आहे.

BRS च्या योजनांमुळे प्रभावित

बीआरएसने तेलंगणात शेतकरी आणि गरीबांच्या कल्याणासाठी राबविलेल्या योजनांमुळे प्रभावित होऊन सुरेखा पाटील यांनी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी हैदराबादमध्ये बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांना सफर घडवत बीआरएस सरकारने राबविलेल्या योजना दाखविण्यात आल्या.

प्रवेशकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांचे भोजन

बीआरएस पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकार्‍यांसोबत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दुपारी भोजन केले. यावेळी राजकीय घडामोडींवर त्यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी महिलांकडून त्यांच्या मतदार संघातील राजकीय परिस्थिती, विकासाची माहिती घेतली. सुमारे चार तास वेळ देऊन केसीआर यांनी BRS च्या राजकीय समीकरणांची मांडणी केली.

Surekha Patil BRS News (3)

BRS च्या टॅक्सीमुळे तिरंगी लढत

पाटणमध्ये आजवर केवळ पाटणकर-देसाई, या दोनच गटात राजकीय संघर्ष होत आला आहे. तिसर्‍या पक्षाला अथवा नेतृत्वाला आपली ताकद दाखवता आलेली नाही. यापुर्वी काँग्रेसने विधानसभेला उमेदवार उभा केला होता. मात्र, कॉंग्रेसला सपशेल अपयश आले होते. आता पुन्हा एकदा पाटणमध्ये बीआरएसच्या उमेदवार सुरेखा पाटील यांच्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.