Saturday, March 25, 2023

गेल्या ७२ तासांत ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू; राज्यातील पोलिसांच्या मृत्यूचा आकडा ८१ वर

- Advertisement -

मुंबई । गेल्या ७२ तासांत महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांच्या मृत्यूचा आकडा ८१ झाला असून एकट्या मुंबईतच (mumbai) आतापर्यंत ४८ पोलीस दगावले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस दलालाही कोरोनाचा विळखा बसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या ७२ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथील ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वालिव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई जितेंद्र भालेराव (३८) आणि नवी मुंबई पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अविनाश दादेकर (४७) यांचा सोमवारी तर वाहतूक खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव (५५) यांचा रविवारी मृत्यू झाला. स्पेशल ब्रँच-१ चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल रणपिसे (५७) यांचा रविवारी मुंबईत मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

कॉन्स्टेबल किरण साळुंखे (४०) यांचा ९ जून रोजी पालघरमध्ये मृत्यू झाला होता. साळुंखे हे मुरबाडचे रहिवासी आहेत. त्यांना नालासोपारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना २ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याशिवाय कोस्टल सेक्युरिटी ब्रँचचे कॉन्स्टेबल दादेकर यांचा सोमावारी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे १८ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल रणपिसे यांच्यावर मालाडच्या लाइफ लाइन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी एप्रिलमध्ये विशेष रजा घेतली होती. रणपिसे हे करोनाबाधिताच्या संपर्कात कसे आले हे माहीत नाही. त्यांना हृदयाची समस्या होती. श्वास घ्यायला त्रास होत असल्याची गेल्या महिन्यात त्यांनी तक्रारही केली होती. त्यांना सर्दी-खोकला होता. पण ताप नव्हता. त्यांना ३ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ जुलै रोजी त्यांचा रिपोर्ट आला असता त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”