उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – पुन्हा एकदा उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून (building slab collapses) चौघांचा मृत्यू (Death) तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना (Injury) उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशामन दलाकडून ढिगारा उपसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील ओटी सेक्शन भागात मानस टॉवर नावाची पाच मजली इमारत आहे. यातच इमारतीच्या तिसरा मजल्याचा स्लॅब (building slab collapses) थेट तळमजल्यावर असलेल्या चक्कीवर येऊन कोसळला. या दुर्घटनेत काही जण इमारतीत असल्याने ढिगार्याखाली दबले गेले आहेत. सागर ओचानी, रेणू धनवानी, धोलानदास धनावनी, प्रिया धनवानी अशी या दुर्घटनेत मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर एकजण गंभीर जखमी आहे.
या आधीच उल्हासनगर महापालिकेकडून मानस टॉवर ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. तरीही काही जण लपून-छपून या इमारतीत वास्तव्य करत होते. यामुळे या दुर्घटनेत (building slab collapses) नक्की अजून किती जण ढिगार्याखाली दबले गेले आहेत ते अद्यापही सांगता येत नाही. या दुर्घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेकडून एनडीआरएफच्या टीमला सुद्धा पाचारण करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख यांच्याकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर